आर.आर. पाटील स्वच्छ राजकारणी
पुणे, 2 नोव्हेंबर – राज्यातील आणि देशातील आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. आता परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. परंतु विधानसभा निवडणूक संपल्यानंतर दोन महिन्यात या योजनाचे काय होणार? हे स्पष्ट होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.
पवार साहेब म्हणाले, राज्यातील आणि देशातील आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. आता परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. परंतु विधानसभा निवडणूक संपल्यानंतर दोन महिन्यात या योजनाचे काय होणार? हे स्पष्ट होईल. एखादा व्यक्ती गेल्यानंतर नऊ वर्षांनी त्यांच्यासंदर्भात बोलणे चुकीचे आहे. आर.आर.पाटील स्वच्छ राजकारणी म्हणून राज्यात नाही तर देशात प्रसिद्ध आहे. आर.आर. पाटील यांच्यासंदर्भात असे काही घडायला नको होते. परंतु, सत्ता असली की अशा पद्धतीने वापर केला जातो. काहीही बोलले जाते, असे पवार म्हणाले.
पाडव्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील जनतेला चांगले दिवस यावेत त्यांच्या जीवनात स्थिरता यावी, त्यांच्या समस्यांची सुटका व्हावी अशी अपेक्षा आहे. मला स्वतला राज्याच्या स्थितीची चिंता वाटते. कारण काही महत्त्वाचे प्रश्न हाताळण्यात राज्यकर्त्यांना अपयश आलं आहे. केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या मंत्रालयाने रँकिंग केलं आहे. जे राज्य पहिल्या नंबरवर होतं त्याचा नंबर पहिल्या पाचमध्ये नाही, असे पवार यांनी म्हटले आहे.
पुढे शरद पवार म्हणाले की,उत्पन्नात काही बाबतीत महाराष्ट्राला धक्का बसला आहे. हे केंद्र सरकार सांगत आहे. यावरून परिस्थिती गंभीर आहे हे दिसतं. त्यातून मार्ग काढण्यासाठी सत्ता परिवर्तन आवश्यक आहे. संपूर्ण बदल करण्याची ताकद ज्यांच्यात आहे, त्यांना बळ दिलं पाहिजे. आज महाविकास आघाडी हा पर्याय आहे. महाविकास आघाडीच्या सामुदायिक परिवर्तनाने आपण परिवर्तन आणू शकतो आणि चित्र बदलू शकतो. आज पाडव्याच्या दिवशी हाच निर्धार करायचा की परिवर्तन करायचं आणि राज्याला चांगल्या मार्गावर आणायचं. लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा आहे. असेही पवार म्हणाले.
अनेक गोष्टी हल्ली होतात. हे सरकारचं वैशिष्ट्ये आहेच. विमानने फॉर्म पोहोचवला. अनेक जिल्ह्यातून ऐकतोय, अधिकाऱ्यांकडून ऐकतोय, सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना अर्थ सहाय्य दिलं जातं त्यासाठी पोलीस दलाच्या गाड्या वापरल्या जातात. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद पोहोचवली जाते. त्या विभागातील अधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळतं, असे पवार यांनी बोलताना सांगितले आहे.