भाजप उमेदवार संजय केळकर मोठ्या मताधिक्याने निवडून येणार – मनोज तिवारी

0

ठाणे: आम्ही सिनेमा करतो, गाणी गात असतो. मात्र आज आमचा सगळ्यात मोठा उद्देश आहे, की गरीबांना चांगले दिवस यावेत, मोदी सरकारने काही समस्या सोडविल्या आहेत, काही सोडवायच्या आहेत. त्यासाठी आपल्या सर्वांना एकजुट होऊन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आणायचे आहे. मोदी यांना डबल इंजिनची भेट द्यायची असल्याचे आवाहन सिने अभिनेते मनोज तिवारी यांनी केले. ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार विद्यमान आमदार संजय केळकर हे राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशा खात्री देखील त्यांनी दिली.

मंगळवारी सांयकाळी केळकर यांच्या प्रचार रॅलीला मनोज तिवारी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते उपस्थितींना संबोधीत करतांना बोलत होते. इतर आमदारांनी पीए ठेवले आहेत. परंतु केळकर हे जनसेवक आहेत, ते थेट सर्वांना भेटतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे महायुतीसाठी मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडा असे आवाहनही त्यांनी केले. महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींसाठीची दिली जाणारी रक्कम ही २१०० रुपये केली जाणार आहे, सरकार आल्यावर भ्रष्टाचार समुळ नष्ट केला जाईल. आशा वर्कर यांना १५०० रुपये दिले जाणार आहेत. भाजपवाले जे बोलतात ते करतात हे यापूर्वीच्या निर्णयांवरुन देखील दिसले आहे. त्यामुळे तुम्हाला देखील आता विश्वास दाखवून महायुतीला निवडून द्यायचे आहे असे आवाहनही त्यांनी केले. एक रहेगें ते नेक रहेंगे आणि सेफ रहेंगे असा नाराही त्यांनी यावेळी दिला. मागील काही दिवसापासून ठाणे शहर विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी संजय केळकर यांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. ठिकठिकाणी त्यांच्या रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी तर त्यांच्या रॅलीला प्रसिध्द अभिनेते तथा भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी हजेरी लावली होती. सांयकाळी ५ ते ७ या कालावधीत केळकर यांची रॅली मानस आनंद सोसायटी डोंगरीपाडा, शिवसेना शाखा डोंगरीपाडा, शुक्ला नाका, निसर्ग तपोवन उपवन सोसायटी, कमिशनर बंगला पातलीपाडा या मार्गावर रॅली गेली. प्रत्येक ठिकाणी केळकर यांच्या रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले. या रॅलीत येथील स्थानिक नागरीकांनी देखील मोठ्या संख्येने स्वत:हून सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.

त्यानंतर ही रॅली ७ ते १० या वेळेत मानपाडा मार्केट, हनुमान मंदिर दुर्गा नगर, शंकर मंदिर मनोरमा नगर, शनी मंदिर शिवाजी चौक या भागातून गेली. या ठिकाणी देखील नागरीकांनी केळकर यांच्या रॅलीचे स्वागत केले. काही ठिकाणी महिलांनी केळकर यांचे औक्षण केले तर काही ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. या रॅलीत भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, कविता पाटील, अर्चना मनेरा, परिवहन सदस्य विकास पाटील, सुरेश दळवी, सुनील नरे, अर्चना पाटील, श्रीराम ठाकूर, महेश कदम आदींनी सहभाग घेतला होता.

 

 

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech