नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : भारतात हिंदू समाजावर, उत्सवांवर आणि मंदिरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. गेल्या काही दिवसातील 300 हल्ल्यांची यादी जाहीर करुन विश्व हिंदू परिषदेने निषेध नोंदवला आहे.
यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, हिंदू समाजावर होत असलेले हल्ले हे सिद्ध करतात की जिहादी हे आक्रमक आहेत. सत्तालोलुप राजकीय पक्ष हिंसक प्रवृत्तींना प्रोत्साहन देत आहेत. देशाला गृहयुद्धाकडे नेण्याची प्रेरणा देत आहेत.
प्रत्येक नागरिकाने देशाची घटना, कायदे, न्यायव्यवस्था आणि राष्ट्रीय संस्कृती आणि परंपरा यांचा आदर करणे आवश्यक आहे. शांततापूर्ण सहजीवनासाठी ही एक आवश्यक अट आहे, असे जैन यांनी सांगितले. देशात जानेवारी 2023 पासून 2024 च्या छठपूजेपर्यंत 300 हून अधिक हल्ले आणि अत्याचाराच्या घटना झाल्या आहेत.
संपूर्ण जग आधीच टेरर जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद, लोकसंख्या जिहादने त्रस्त आहे, आता स्पिट जिहाद, युरिन जिहाद, ट्रेन जिहाद, मायनर जिहाद इत्यादींच्या माध्यमातून गैरमुस्लिमांबद्दलचा त्यांचा द्वेष समोर येत असल्याचे डॉ. जैन म्हणाले. यासाठी हिंदू समाजाने संघटित राहण्याचे आवाहन विहिंपने केले आहे.
भारतातील अनेक मौलाना आणि मुस्लिम नेते हिंदू समाजाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. मात्र, या धमक्यांवर धर्मनिरपेक्ष समाजाचे मौन धक्कादायक आहे. देशात 1946 मध्येही अशाच प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या, असे जैन यांनी सांगितले.