ठाणे : जिल्ह्यातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांत गृहमतदानास सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांत ७४६ आजी, आजोबा आणि दिव्यांगांनी मतदानाचा अधिकार बजावला. गृहमतदानास ८५ वरील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
जे मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत अशांसाठी निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सोय केली आहे. तीन दिवसांत
भिवंडी ग्रामीण, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ओवळा माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे अशा मतदारसंघांत मतदान पार पडले.