मुंबई, 20 नोव्हेंबर : महाराष्ट्र राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यातील २८८ विधानसभेच्या जागांसाठी हे मतदान आहे. सामान्यापासून सर्वच सेलिब्रिटीमंडळी ही आपला मतदानाचा हक्क बजावत आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत मतदानाचा हक्क बजावताना सेलिब्रिटी दिसत आहेत.
मराठीसह बॉलिवूडविश्वातील सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच अनेकांनी कलाकारांनी मतदान केल्यानंतर चाहत्यांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडित यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. तर अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जेनेलियासह मतदान केले. अभिनेता हेमंत ढोमे याने ही सोशल मीडियावर मतदान केल्याचे फोटो शेअर केले आहेत. ‘जय महाराष्ट्र’ म्हणत अभिनेत्री सायली संजीवने मतदानाचा हक्क बजावला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमारने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केंद्रावरील व्यवस्था चांगली असल्याचं त्याने म्हटलं आहे.अभिनेता राजकुमार राव यानेसुद्धा मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच तमन्ना भाटिया सोनू सूद, फरहान अख्तर, मंदार चांदवाडकर यांनी देखील मतदान केले आहे.