धुळे : शहरासह जिल्हाभरात मतदान उत्साहात सुरू असून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. तसेच वाहनांची तपासणी केली जात आहे.
दरम्यान आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिसांनी पहाटे ५ वाजता एका कंटेनरची तपासणी केली असता त्यात १० हजार किलो चांदीच्या वीटा मिळाल्या आहेत.
३० किलो चांदीची एक वीट अशा ३३६ विटा आहेत. त्याची किंमत ९४ करोड ६८ लाख रुपये इतकी आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
हा माल एचडीएफसी बँकेचा असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळत असून पोलिस अधिक तपास करीत आवश्यक कागदपत्रांची तपासणी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.