ठाणे :महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या बारवी गुरूत्ववाहिनीवर कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात आहे. त्यामुळे, गुरूवार, २८ नोव्हेंबर रात्री १२.०० वाजल्यापासून शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी या काळात ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पाणी पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे या काळासाठी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, तसेच, पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.