मुंबईत पुन्हा बेस्टचा अपघात

0

मुंबई : मुंबईत बेस्ट बसने पुन्हा एकदा अपघात घडवून आणला आहे. शिवाजीनगर ते कुर्ला मार्गावर प्रवास करत असताना या बसने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये २५ वर्षीय युवक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दीक्षित विनोद राजपूत असे २५ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीव्हीजी ग्रुपच्या ओला भाडेतत्त्वावरील बसचा गोवंडी येथील शिवाजी नगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. शनिवारी (14 डिसेंबर) रात्री साडे अकराच्या सुमारास बस क्रमांक A350 ही बस गोवंडीतील शिवाजीनगर बस डेपोतून कुर्ला येथे जाण्यासाठी निघाली होती. रात्री 12.15 च्या सुमारास शिवाजी नागर जंक्शन हायवे बस स्टॉपच्या पुढे सदर बसला उजव्या बाजूने एक दुचाकी ओव्हरटेक करत असताना अपघात घडला आहे. दुचाकीवरील तरुण बसच्या मागील चाकाखाली आला. यावेळीच बसचा मागील बाजूचा टायर फुटला आणि तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली. जखमी व्यक्तीला पोलिसांनी व्हॅन टाकून तातडीने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 39 वर्षीय विनोद आबाजी रणखांबे हे बसचालक असून 39 वर्षीय अविनाश विक्रमराव गिते हे अपघातग्रस्त बसवर कंडक्टर होते.

मुंबईतील बेस्ट बस अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या आठ महिन्यांत बेस्ट बस अपघातांमध्ये एकूण २२ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. यामुळे प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने बेस्ट प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.याआधी कुर्ला येथे घडलेल्या एका बेस्ट बस अपघाताने मुंबईकरांना हादरवून सोडले होते. इलेक्ट्रिक बसने नियंत्रण सुटल्याने त्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर ४२ जण गंभीर जखमी झाले होते. २० पेक्षा जास्त वाहने या अपघातात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.या अपघाताच्या संदर्भात, बस चालक संजय मोरे याला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत समोर आले की मोरे याला इलेक्ट्रिक बस चालवण्याचा पुरेसा अनुभव नव्हता. फक्त एक दिवसाचे प्रशिक्षण आणि तीन वेळा बस चालवण्याचा सराव करूनच त्याला रस्त्यावर बस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech