डोंबिवली : मध्य रेल्वे प्रवासादरम्यान अपमृत्यू कमी करून झिरो एक्सीडेंट मोहिमे अंतर्गत लाईन क्रॉसिंग किंवा चालत्या ट्रेन पकडल्यामुळे तसेच चालत्या ट्रेनमधून उतरल्यामुळे होणारे अपमृत्यूचे प्रमाण कमी करण्याकरिता प्रतिकात्मक पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.
डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे डोंबिवली रेल्वे पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज जारवाल व आर पी एफ, डोंबिवली चे प्रभारी निरीक्षक गजेंद्र राऊत, उपनिरीक्षक मनोरे तसेच डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे व आर पी एफ डोंबिवलीच्या अंमलदार यांनी एकत्रित येऊन लाईन क्रॉसिंग व चालत्या ट्रेनमधून पडुन होणारे अपमृत्यू ला प्रतिबंध होण्यासाठी आरपीएफ अंमलदार गायकवाड यांना यमराजची वेशभूषा करून प्रवाशांमध्ये प्रतिकात्मक जनजागृती केली.
सदर जनजागृतीमध्ये प्रवाशांनी रेल्वे लाईन क्रॉस करू नये, ओव्हरब्रिजचा वापर करावा, प्रवाशांनी चालते ट्रेन पकडून प्रवास करू नये, प्रवाशांनी चालत्या ट्रेन मधून उतरू नये, लोकलचे बाहेर फुटबोर्ड वर लटकून प्रवास करू नये याविषयी मेगाफोनद्वारे प्रवाशांना मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत आवाहन करण्यात आले.