ठाणे – किसन नगर परिसरात झाली सर्वंकष स्वच्छता मोहीम

0

ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे शनिवारी सकाळी वागळे प्रभाग समितीतील किसन नगर परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत मोठे रस्ते आणि चौक यांची स्वच्छता सुरू करण्यात आली होती. त्यातच आता झोपडपट्टी परिसर, अंतर्गत रस्ते यांचीही स्वच्छता करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालय यांच्या स्वच्छतेची मोहीम वागळे प्रभाग समितीतील किसननगर परिसरात राबवण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण विभाग आणि वागळे इस्टेट प्रभाग समिती यांच्या समन्वयाने या परिसरातील गटारे, अंतर्गत रस्ते, छोट्या गल्ल्या, पाईप लाइन गलतचा रस्ता, सार्वजनिक शौचालय यांची सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनात, या स्वच्छता मोहिमेत सुमारे १०० स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत उपायुक्त मनीष जोशी आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे यांनीही सहभाग घेतला. माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे तसेच शिवशांती प्रतिष्ठानचे स्वयंसेवकही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले.

सर्वकष स्वच्छता मोहिमेत झोपडपट्टी परिसरातील अंतर्गत रस्ते, गटारे, आणि सार्वजनिक शौचालय यांची स्वच्छता करण्यात येत आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरानंतर आज किसननगर येथील परिसरात सर्वंकष स्वच्छता करण्यात आली. गटारे साफ करण्यापासून ते सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेपर्यंत काम करण्यात आले. या भागात पडलेला राडारोडाही उचलण्यात आला. या मोहिमेत लोकप्रतिनिधींसह स्वयंसेवी संस्थांनीही सहभाग घेऊन आमचा हुरूप वाढवल्याचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) मनीष जोशी यांनी सांगितले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech