धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ १५ नोव्हेंबरला भेटीला

0

मुंबई, 12 नोव्हेंबर : १५ नोव्हेंबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’ हा प्रेमाची नवी व्याख्या सांगणारा चित्रपट खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटांच्या कक्षा रुंदावणारा ठरणार आहे.

‘नाद – द हार्ड लव्ह’च्या रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असलेला संगीतप्रधान रोमँटिक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘देवमाणूस’ या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घरोघरी लोकप्रिय झालेला अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याचे एक वेगळेlच रूप यात आहे.

निर्माते संजय पगारे आणि रुपेश दिनकर यांनी शकुंतला क्रिएशन प्रोडक्शन आणि जिजाऊ क्रिएशन मेकरच्या बॅनरखाली बनवलेला ‘नाद – द हार्ड लव्ह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रुपाली दिपक पवार आणि वैशाली नितीन पवार या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत.

दिग्दर्शनाची धुरा प्रकाश जनार्दन पवार यांनी सांभाळली आहे. आपल्या कल्पक दिग्दर्शन शैलीद्वारे पवार यांनी ‘नाद’मध्ये एक अनोखी प्रेमकहाणी सादर केली आहे. या चित्रपटात उदय आणि शुभ्रा यांची प्रेमकहाणी पाहायला मिळेल.

या चित्रपटातील अजिंक्य ही आणखी एक महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. ‘नाद’ हा म्हणजे दोन प्रेमी जीवांची आवड पूर्ण करण्याचा प्रवास आहे.

या चित्रपटात जरी आजवर कधीही न पाहिलेली लाल मातीतील अ‍ॅक्शनदृश्ये पाहायला मिळतील.

सकस कथानकाला मुद्देसूद कथानकाची जोड आणि सहजसुंदर अभिनयाच्या साथीने सादर केलेली प्रेमकथा हे ‘नाद’चं वैशिष्ट्य आहे.

या चित्रपटामध्ये दोन रोमँटिक, एक सॅड आणि एक धमाल नाचो गीत अशी एकूण चार गाणी आहेत. मराठी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे संगीतकार पंकज पडघन यांनी गीतकार वैभव देशमुख आणि विनायक पवार यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतसाज चढवला आहे. ‘डोळ्यांत तूच आहे…’, ‘तुझ्यामुळे जिंदगी सपान वाटते रे…’, ‘नादखुळा डान्स करा रे…’ आणि ‘जीवाचे हाल…’ ही चारही गाणी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रसंगी येतात आणि मनाला भुरळ घालतात.

अर्थपूर्ण शब्दांना सुरेल संगीताची जोड हे या गाण्यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीकरण करण्यात आल्याने पडद्यावर चित्र पाहताना ते सुखावह वाटेल.

किरण गायकवाडची मुख्य भूमिकेसाठी करण्यात आलेली निवड आणि त्याची सपना माने या नवोदित अभिनेत्रीसोबत जमलेली जोडी चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

किरण गायकवाडसाठी हा चित्रपट इमेज ब्रेकिंग ठरणारा असून, त्याने आपल्या व्यक्तिरेखेसाठी खूप मेहनत

घेतल्याचे दिग्दर्शक जनार्दन पवार म्हणाले. ते म्हणाले की, चित्रपटातील व्यक्तिरेखांसाठी अचूक कलाकारांची निवड करण्यात आली आहे. किरणसारखा तगडा अभिनेता मुख्य भूमिकेत असल्याने ‘नाद’ एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे.

त्याला सपनाची सुरेख साथ लाभली आहे. इतर कलाकारांनी आपापल्या व्यक्तिरेखांना न्याय देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यातील गाणी संगीतप्रेमींच्या ओठांवर रुंजी घालणारी असून, चित्रपटगृहातून बाहेर पडणारे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर एक परिपूर्ण कलाकृती पाहिल्याचा आनंद पाहायला मिळेल अशी आशाही पवार यांनी व्यक्त केली आहे.

संतोष दाभोळकर आणि दिपक पवार यांनी या चित्रपटाची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन डॉ. विनायक पवार यांनी केलं आहे. किरण गायकवाड आणि सपना माने यांच्यासह यशराज डिंबळे, तानाजी गालगुंडे, किरण माने, विजय पाटकर, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, टिशा संजय पगारे, सूरज पवार, विनायक पवार, श्रीकांत गायकवाड, गणेश पदमाळे, आशिष वारंग, ईश्वर सातलिंग बोरामणी आदी कलाकारांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

कला दिग्दर्शन सतीश चिपकर यांनी केले असून, डिओपी अमित सिंह यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. कोरिओग्राफी सिद्धेश दळवीने केली असून, वेशभूषा निगार शेख यांची आहे. रमेश शेट्टी या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून आमिरा शेख क्रिएटिव्ह हेड आहेत. लाइन प्रोड्युसर संकेत चव्हाण असून, सुजित मुकटे कार्यकारी निर्माते आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech