सोलापूर : संजय शिंदे नावाचे तीन उमेदवार

0

सोलापूर, 2 नोव्हेंबर :  युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असते, असे म्हणतात. आता युद्ध म्हणजे निवडणुका असेच दिसू लागले आहे. निवडणुकीत समोरच्याला पराभूत करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरल्या जातात. नावात साधर्म्य असलेले उमेदवार, निवडणूक चिन्हातील साधर्म्य यासह विविध फंडे निवडणुकीत डोकेदुखी वाढवून जातात.

जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा फड आता रंगू लागला आहे. करमाळ्यात आणि माढ्यात सारख्या नावाचे अनेक उमेदवार मैदानात असल्याने सेम नेमची शक्कल कोणाची? सेम नेमचा फॉर्म्युला कोणाचा गेम करणार? या बद्दल उत्सुकता लागली आहे.

करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा विठ्ठलराव शिंदे हे पुन्हा एकदा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात तीन संजय शिंदे मैदानात उतरले आहेत. दहिगाव (ता. करमाळा) येथील संजय वामन शिंदे हे बसपकडून मैदानात आहेत.

खांबेवाडी (ता. करमाळा) येथील संजय लिंबराज शिंदे, चिंचगाव (ता. माढा) येथील संजय विठ्ठल शिंदे हे अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरले आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech