जम्मू-काश्मीर : चकमकीत 2 दहशतवादी ठार

0

श्रीनगर, 02 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी शनिवारी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान
घातले.यासंदर्भातील माहितीनुसार शनिवारी अनंतनागमध्ये काही जिहादी दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली.

त्यानंतर सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. या दरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना ठार केले. काश्मीर खोऱ्यात दहशतवादाशी संबंधित शुक्रवारपासूनची ही चौथी घटना आहे.

बडगाम जिल्ह्यात शुक्रवारी उत्तर प्रदेशातील 2 कामगारांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले.

त्यांच्यावर श्रीनगरमधील जेव्हीसी हॉस्पिटल बेमिनामध्ये उपचार सुरू आहेत.जम्मू- काश्मीरमध्ये शनिवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमक सुरु झाली.

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर श्रीनगरमधील खानयारयेथे सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. येथे अद्याप चकमक सुरु आहे. पोलीस आणि सीआरपीएफ यांची येथे संयुक्त कारवाई सुरु आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech