केरळ : रेल्वेच्या धडकेत 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यू तिरुअनंतपुरम

0

02 नोव्हेंबर : केरळ एक्स्प्रेस ट्रेनच्या धडकेत 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत सफाई कर्मचारी हे तामिळनाडू येथील रहिवासी होते. केरळच्या पलक्कड येथे हे कर्मचारी पुलावरून चालत असताना केरळ एक्स्प्रेसने त्यांना धडक दिली.

तिघांचे मृतदेह हाती लागले असून एका व्यक्तीच्या मृतदेहाचा नदीत शोध सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली. यासंदर्भातील माहितीनुसार तमिळनाडूतील 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचे पथक भरतपुझा नदीच्या पुलावरील ट्रॅक साफ करत होते.

तेवढ्यात केरळ एक्सप्रेस ट्रेन आली. ते वेळेत दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि रुळांमध्ये अडकले. त्यामुळे रेल्वेची धडक बसल्याने ते नदीत पडले. या अपघातात 4 स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यात 2 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.

सध्या तिन्ही मृतदेह हाती लागले असून चौथ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. वल्ली, राणी, लक्ष्मण आणि आणखी एक अनोळखी पुरुष अशी मृतांची नावे आहेत. नवी दिल्ली-तिरुवनंतपुरम ट्रेनने दुपारी 3 वाजता या कर्मचाऱ्यांना धडक दिली.

हे सफाई कामगार रेल्वे स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या शोरणूर पुलाजवळील रेल्वे रुळावरील कचरा साफ करत होते. या धडकेमुळे साफसफाईच्या कामात गुंतलेले रेल्वे कर्मचारी रुळावरून खाली पडले.

या कर्मचाऱ्यांनी ट्रेन येताना पाहिली नसावी, ज्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech