दहशतवाद आणि खेळ एकत्र होऊच शकत नाही – परराष्ट्र मंत्रालय

0

नवी दिल्ली  – दहशतवाद आणि खेळ हा एकत्र होऊच शकत नाही, अशा शब्दात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर केली. त ्यामुळे पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. पण पाकिस्तानमधील सुरक्षेच्या कारणावरून भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसीला कळविले आहे. या स्पर्धेसंदर्भात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेची (आयसीसी) आयोजित महत्त्वाच्या बैठकीआधीच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपला भूमिका जाहीर केली.

प्रवक्ते जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये सुरक्षेशी संबंधित समस्या आहेत, त्यामुळे संघ पाकिस्तानात जाणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत. पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न आहे. सुरक्षेची चिंता आहे आणि म्हणून संघ पाकमध्ये खेळण्यासाठी जाणार नाही, असे जैस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.

बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबद्दल प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांच्या परिस्थितीबाबत आम्ही विरोध अगदी स्पष्ट केला आहे. आम्ही हा मुद्दा बांगलादेशासमोर मांडला आहे की त्यांनी अल्पसंख्याकांचे रक्षण करणे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे, त्यांचे रक्षण करणे आणि त्यांना सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.

चिन्मय कृष्णा दासच्या अटकेबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना जैस्वाल म्हणाले, आम्ही इस्कॉनकडे सामाजिक सेवेची जागतिक स्तरावर प्रतिष्ठित संस्था म्हणून पाहतो. चिन्मय दास यांच्या अटकेबाबत आम्ही आमचे म्हणणे मांडले आहे. याबाबत खटले आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत. आम्ही आशा करतो आणि अपेक्षा करतो की या प्रक्रिया निष्पक्ष, न्याय्य आणि पारदर्शक रीतीने हाताळल्या जातील आणि या व्यक्तींचा आणि संबंधित सर्वांचा पूर्ण आदर सुनिश्चित केला जाईल.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech