मुंबई : विधानसभा उद्धव निवडणुकीदरम्यान बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वर्सोवा विधानसभा मतदारसंघात हारून खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आता ठाकरे गटाच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आता एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत केवळ खान राहिले आहेत, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दिंडोशी मालाड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भास्कर परब यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांनी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी उर्दूमध्ये पत्र काढले आहे, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी निशाणा साधला मराठवाड्यामध्ये खान हवा की बाण हवा अशा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याकडून बाण निघून गेला आहे तर फक्त खान उरला आहे, असेदेखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचा उमेदवार हारून खान यांच्या नावातच हरू आहे. त्यामुळे तो कसा जिंकणार, असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.