नवी मुंबई विमानतळावर विमानाचे यशस्वी लँडिंग

0

कमर्शिअल ऑपरेशन्सचा परवाना

नवी मुंबई : नवी मुंबईच्या निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर इंडिगोच्या ए-320 या प्रवासीविमानाचे यशस्वी लँडिंग झाले. त्यामुळे आता या विमानतळाला व्यावसायिक ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी पहिल्या नागरी प्रवासी विमानाच्या यशस्वी चाचणीनंतर सांगितले की, विमानतळाचे व्यावसायिक उद्घाटन 17 एप्रिलपर्यंत व्हावे हा आमचा प्रयत्न आहे. आगामी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून देशांतर्गत कामकाज सुरू होईल कारण उद्घाटनाच्या उड्डाणानंतर काही प्रक्रियांचे पालन करावे लागेल ज्याला सुमारे 4 आठवडे लागतील. जुलै 2025 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय कामकाज सुरू करू अशी आशा असल्याचे बन्सल यांनी सांगितले.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने (एनएमएआय) आपल्या पहिल्या व्यावसायिक उड्डाण प्रमाणीकरण चाचणीसह ऑपरेशनच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले, रनवे 26/08 वर दुपारी 1.32 वाजता इंडिगोचे प्रवासी विमानत यशस्वीरित्या उतरले.

एनएमआयएच्या दोन क्रॅश फायर टेंडर्सने (सीएफटी) या विमानाचे पारंपरिक वॉटर सॅल्युटने स्वागत केले.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. पडताळणी उड्डाण यशस्वीपणे पूर्ण करणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आम्ही आता प्रत्येक टप्प्यावर सुरक्षेला प्राधान्य देत विमानतळ कार्यान्वित करण्याच्या एक पाऊल जवळ आल्याचे बन्सल यांनी सांगितले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech