ठाणे : देशाचे तुकडे करायची भाषा करणाऱ्यांसोबत काँग्रेस आहे. देशाला तोडण्याचे, समाजासमाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेसने केले आहे. तेव्हा एक राहिलो तरच देश विकासाकडे वाटचाल करणार आहे, असे प्रतिपादन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात आलेल्या मुख्यमंत्री सैनी यांनी मंगळवारी ठाण्यातील भाजपा मिडिया सेंटरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे हरियाणा येथील खासदार डॉ. हेमांग जोशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले,
प्रदेश प्रवक्ते सुजय पत्की, माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, महामंत्री सचिन पाटील, डॉ. समिरा भारती आदी उपस्थित होते.
हरियाणामध्ये जनतेने तिसऱ्यांदा भाजपला बहुमत दिले यात गरिबांचा वाटा मोठा आहे. काँग्रेस खोटी आश्वासने देऊन मत विभागणी करते आणि नंतर गरिबांचे शोषण करते हा त्यांचा पूर्वइतिहास आहे, अशी टीका मुख्यमंत्री सैनी यांनी केली.