हेवी वेट नेते भुजबळ यांना धक्का

0

नाशिक : फडणवीस यांचा मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना मोठा धक्का मिळाला आहे याची वेगवेगळी कारण असली तरी त्यातील प्रमुख कारण म्हणजे राज्यस्तरावरती भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवलेली नाराजी त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गद्दारी करत अपक्ष उमेदवारी अर्ज नांदगाव मतदारसंघातून दाखल केला होता त्या ठिकाणी त्यांना माघार घेण्याचे सांगण्यात आल्यानंतरही समीर भुजबळ यांनी माघार घेतली नाही त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिक मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात दोन ठिकाणी उमेदवार देण्यात आले .

त्यामुळे एक प्रकारे अजित पवार यांच्या एकनिष्ठतेवरती भुजबळ यांनी प्रश्न उभा केल्याने राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कडून भुजबळांचे नाव दिले गेले नाही आणि मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचे सांगून अजित पवार यांनी यावर सर्व चेंडू हा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला. तर यापूर्वीही विधान परिषदेमध्ये भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना आमदार बनविण्यात आले आहे त्यामुळे एका घरात दोन आमदारकी झाली आहे आणि त्यातच मंत्री करणे म्हणजे एक प्रकारे घराणेशहीला खतपणी घालण्यासारखे होते आणि भाजप घराणेशाही विरोधात असल्यामुळे भुजबळांना त्याचाही मोठा फटका बसला.

याशिवाय मराठा आणि ओबीसी राजकारणामध्ये छगन भुजबळ यांनी जो आक्रमकपणा दाखवला तो सरकारला म्हणजेच महायुतीच्या मागील सरकारला शेवटी शेवटी खूपच जड गेलं आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी देखील टोकाची भूमिका घेतली होती पण सरकारमधील महायुतीचे नेतृत्व करणारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यावेळी चे दोन्ही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्या बाबत सरकारची कोणतीही भूमिका स्पष्ट न करता शांत राहणं पसंत केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे जरंगे पाटलांचा विरोध हा शांत केला पण भुजबळ यांनी घेतलेला आक्रमक पाऊल हे सरकारला धोक्याचं होतं त्यामुळेच भुजबळांना यावेळी त्याचा फटका सहन करावा लागला.

पण याचा पक्षीय स्तरावरती विचार केला तर आज ओबीसी घटकांसाठी काम करणाऱ्या मंत्र्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये भाजपाला पंकजा मुंडे यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळाला आहे आणि अशा असताना भुजबळ यांना पुन्हा पुढे यांना हे अवघड होतं म्हणूनच एक प्रकारे भुजबळांना बाजूला सारण्याचा प्रकार या निमित्ताने केला गेला आहे जेणेकरून येणाऱ्या काळात भाजपा आणि ओबीसी अशी प्रतिमा निर्माण व्हावी याची बीजे या निमित्ताने रोवली गेली आहेत. असे मत जिल्ह्यातील राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech