नाशिक : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये उत्तर महाराष्ट्रात एकूण सात मंत्र्यांना मंत्री करण्यात आलेले आहे यामध्ये यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हेवी वेट नेते आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मात्र यावेळी डच्चू देण्यात आलेला आहे.
त्यामुळे मोठा बदल उत्तर महाराष्ट्र मध्ये झाला असला तरी त्याचा थेट संबंध राज्यात जोडला जात आहे. तर राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच अँड.माणिक कोकाटे यांना मंत्री पदाची संधी मिळाली आहे.तर नंदुरबार जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान दिले नाही.
विधानसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत प्राप्त झालं त्यानंतर त्यांचे मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदा स्वतंत्र लढून मिळालेले यश लक्षात घेता मंत्रिमंडळाचा विस्तार कसा असेल यावर वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात होते सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर त्यावेळेस इतर मंत्र्यांचा शपथ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निश्चित असल्याचे फडणवीस यांनी त्यावेळेस स्पष्ट केले होते.
प्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला यामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या वाट्याला एकूण सात मंत्री पद आली आहेत त्यामध्ये भाजपाचे गिरीश महाजन जळगाव मधून भाजपने पुन्हा एकदा संधी दिली आहे गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक मानले जातात आणि फडणवीस सह पक्षाच्या मदतीसाठी ते कधीही धावून जातात त्यामुळे मंत्रिमंडळात त्यांच्या स्थान नक्कीच होतं आणि अपेक्षेप्रमाणेच त्यांना मिळालेला आहे येणाऱ्या काळात ते नाशिकचे पालकमंत्री होऊ शकतात. तर राधाकृष्ण विखे पाटील हे अहमदनगर मधून संधी देण्यात आलेली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांना यापूर्वीच्या दोन्ही मंत्रिमंडळात स्थान दिले होते. त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता आणि नगर जिल्ह्यामध्ये पक्ष वाढीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठा फायदा होत आहे तसेच ते काँग्रेस मधून भाजपा मध्ये आले आहे त्यामुळे याही वेळेत त्यांना संधी मिळाली आहे.
जयकुमार रावल हे शिंदखेडा मधून संधी देण्यात आलेली आहे यापूर्वी मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे धुळे वलगतच्या परिसरामध्ये त्यांची पकड चांगली असल्यामुळे त्यांना मंत्रिमंडळ स्थान देण्यात आलेले आहे यापूर्वी त्यांनी फडणवीस सरकार मध्ये पर्यटन मंत्री म्हणून काम बघितले असून मधल्या काळात त्यांना डावलला गेल्यानंतर सुद्धा ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले.
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जळगाव मधून गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिमंडळ स्थान दिला गेला आहे यापूर्वी त्यांनी उद्धव ठाकरे त्यानंतर शिंदे सरकार आणि आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवला आहे गुलाबराव पाटील यांची जळगाव जिल्ह्यामध्ये एक सच्चा शिवसैनिक म्हणून चांगलीच पकड आहे आणि ओळख ही आहे त्याचा त्यांना यावेळी फायदा होत आहे
नाशिक मधुन दादा भुसे यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे दादा भुसे हे उद्धव ठाकरे त्यानंतर एकनाथ शिंदे आणि आता फडणवीस सरकारमध्ये मंत्री आहेत. माजी सरकारी कर्मचारी म्हणून त्यांची ओळख असली तरी एक सच्चा शिवसैनिक आणि सर्वसामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून दादा भुसे यांची एक वेगळी प्रतिमा आहे आणि त्याच्या त्यांना यावेळी चांगलाच फायदा होताना दिसून येत आहे मंत्री असताना देखील त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केल्याची उदाहरणे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळ यांना मंत्री पदाची संधी देण्यात आली आहे यापूर्वी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष होते काही काळ ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले या काळामध्ये झालेल्या पक्ष फुटीचा आणि त्यावर घेतलेल्या निर्णयाचे फळ त्यांना मंत्रिपदामध्ये यावेळी मिळालेला आहे.
तर सिन्नर मधून माणिक कोकाटे यांना संधी देण्यात आलेली आहे. माणिक कोकाटे हे निष्ठावंत शरद पवार यांचे असले तरी नंतरच्या काळामध्ये मात्र अजित पवार यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी ते एकनिष्ठ राहिले आणि सातत्याने अजित पवारांची पाठराखण करत राहिले कोकाटे यांच्या रूपाने सिन्नरला प्रतिनिधित्व मिळाले आहे.
सर्वसाधारण वीस वर्षानंतर सिन्नरला राज्याच्या मंत्रिमंडळ स्थान मिळाला आहे यापूर्वी तुकाराम दिघोळे यांच्या रूपाने शरद पवारांनी सिन्नर तालुक्याला मंत्रीपदाची संधी दिली होती. कोकाटे हे अतिशय अभ्यासू आणि आक्रमक व्यक्तिमत्व आहे.
यापूर्वी त्यांनी शिवसेना सोडताना नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्यांनी नारायण राणे यांच्याबरोबर भाजपामध्ये न जाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रस्ता पकडला होता नंतर ते अजित पवार यांच्याबरोबर गेले आणि त्यांना या त्या एकनिष्ठेचाच फळ मंत्री पद मिळाला आहे त्यांच्या प्रचाराच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाट्यांना निवडून द्या मी त्यांना मंत्री करतो असे आश्वासन सिन्नर मधील नागरिकांना दिले होते. कोकाटे राज्याच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदीच मंत्री होत आहे.