शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही ? – राहुल गांधी

0

गोंदिया,12 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले. परंतु, देशातील एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी का दिली नाही..? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

गोंदिया येथे मंगळवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राहुल म्हणाले की, पंतप्रधान शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायदे आणल्याचा दावा करत असतात, पण ते काळे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते तर शेतकरी रस्त्यावर का उतरले, भाजप सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना धान, सोयाबीन आणि कापसाला भाव देत नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

मूठभर उद्योगपतींचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 वर्षांत एकाही शेतकऱ्याचे कर्ज का माफ केले नाही? असा प्रश्न राहुल यांनी विचारला. तसेच मोदी अदानी-अंबानींचे आहेत, ते अंबानींच्या लग्नाला गेले होते पण मी तुमचा आहे म्हणून अंबानींकडे लग्नाला गेलो नाही असे त्यांनी सांगितले.

तसेच मोदी आणि संघ देशाची राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला. तसेच काँग्रेस संविधान वाचवण्यासाठी लढत असल्याचे राहुल यांनी सांगितले. मविआसत्तेत आल्यास महिलांच्या बँक खात्यात दरमहा 3 हजार रुपये जमा केले जातील. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हमीभाव दिला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech