15 नोव्हेंबरपर्यंत करता येणार अर्ज
नवी दिल्ली – केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा तसंच कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय युवा पुरस्कार, 2022-23 साठी अर्ज करण्याचे आवाहन देशातील युवा वर्गाला केलं आहे. भारताच्या प्रगतीत तसंच सामाजिक विकासात असाधारण सहयोग देणाऱ्या युवकांना हा पुरस्कार दिला जातो.
क्रीडा, समाजसेवा, विज्ञान किंवा संशोधन अशा विविध क्षेत्रातल्या भारतीय युवकांच्या अतुलनीय प्रतिभेवर भर देत मांडविया यांनी सांगितले की हे पुरस्कार म्हणजे फक्त या प्रतिभांचा गौरव नसून प्रगतीशील आणि सर्वसमावेशक भारताला प्रोत्साहन देणाऱ्या युवा नेतृत्वाचा सोहळा आहे.
युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीतील युवक व्यवहार विभाग आरोग्य,मानवी हक्कांचा पुरस्कार, सजग नागरिक, समाजसेवा आदी क्षेत्रात विशेष कामगिरी आणि सहयोग देणाऱ्या 15 ते 29 वर्षे वयाच्या युवांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करतो,
राष्ट्रीय प्रगती आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे, समाजाच्या प्रति तरुणवर्गाची जबाबदारीची जाणीव वृद्धिंगत व्हावी आणि त्यातूनच उत्तम नागरिक म्हणून त्यांची स्वतःची क्षमता वाढावी तसेच समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रगतीसाठी काम करणाऱ्या युवांना आणि युवा वर्गाच्या स्वयंसेवी संस्थांना त्यांच्या वेगळ्या कामासाठी ओळख मिळावी हा या पुरस्कारांमागचा हेतू आहे..
1 नोव्हेबर पासून 15 नोंव्हेबर 2024 या काळात राष्ट्रीय युवा पुरस्कार (2022-23) साठी गृह मंत्रालयाच्या सर्वसाधारण पुरस्कार पोर्टलवरुन या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी अर्ज करता येईल. https://awards.gov.in/ ही त्यासाठीच्या पोर्टलची लिंक आहे,
एक पदक, प्रमाणपत्र आणि व्यक्तीला रु. 1,00,000/ तर संस्थेला रु 3,00,000/- रोख असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे.