रत्नागिरी : उज्बेकिस्तानमध्ये येत्या ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या काळात होणाऱ्या सिकई मार्शल आर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेकरिता गुहागर तालुक्यामधील जानवळे गावातील योगिता खाडे आणि हुजैफा ठाकूर यांची निवड भारतीय संघात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हे दोन्ही खेळाडू उज्बेकिस्तानला रवाना झाले. स्पर्धेकरिता दोन्ही खेळाडूंना रत्नागिरी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.