ठाणे :वैश्य समाज बांधवांचा भव्य स्नेह मेळावा `लक्ष्य 2025′ रविवार, दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुपच्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. आर्य क्रीडा मंडळ, बेडेकर हॉस्पिटल समोर, गावदेवी मैदान व रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी 8:30 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हा मेळावा होईल.
व्यावसायिक प्रदर्शन दालन, बिझनेस मिक्सर नेटवर्किंग सत्र, महिला व्यावसायिकांना मार्गदर्शन व सादरीकरणाची संधी, पर्यटन वाढीसाठी जिल्हास्तरीय माहिती दालन, समाज बांधवांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम, सरकारी योजना, पतसंस्था, बँकेद्वारे अर्थपुरवठा मार्गदर्शन, परिसंवाद – भविष्य समाज काल, आज आणि उद्या, नोकरी- व्यवसायातील सुवर्णसंधी दालन, विविध वैश्य समाज संस्था आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा आणि उपस्थितांसाठी आकर्षक लकी ड्रॉ बक्षिसे ही या कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
सकाळी 8 ते 9 वा. रजिस्ट्रेशन, त्यानंतर व्यावसायिक प्रदर्शन दालनाचे उद्घाटन, 9:40 ते 11 वा. – लक्ष्य 2025 मेळाव्याचे उद्घाटन आणि मान्यवर पाहुण्यांची भाषणे, युवक युवती सत्र / विद्यार्थी पालक यांना मार्गदर्शन, उद्योजक मार्गदर्शन सत्र, दुपारी 12:40 ते 2 वा. बिझनेस मिक्सर नेटवर्किंग सत्र, दुपारी 2:40 ते 4:15 वा. वैश्य समाज काल, आज आणि उद्या चर्चासत्र, त्यानंतर महिला मार्गदर्शन आणि परिचय सत्र, दुपारी 4:40 ते 5:45 वा. पुरस्कार वितरण सोहळा आणि रात्री 8 वा. मनोरंजन / सांस्कृतिक कार्यक्रम, लकी ड्रॉ बक्षीस वाटप व समारोप असे कार्यक्रमाचे स्वरुप आहे.
उद्योग/ व्यापार करण्यासाठी लागणारे प्रावीण्य, जसे नेटवर्किंग, मार्केटिंग, विक्री कौशल्य, नियोजन, निधी पैसा उभारणी, त्यासाठी लागणारी माहिती व प्रकारचे कौशल्य उद्योजकाने अवगत करून घेतल्यास व्यापारात / उद्योगात प्रगती साधता येते याच उद्देशाने वैश्य सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक, प्रसिद्ध उद्योजक, बिझनेस कोच डॉ. संतोष कामेरकर यांच्या संकल्पनेतून पुढाकाराने वैश्य समाजातील व्यावसायिक, व्यापारी नयीन उद्योजक आणि उद्योगपती यांना मदत / सहकार्य आणि मार्गदर्शन करणार आहोत.