ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे हिरानंदानी लिजेंड आणि फॅंड्री फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “नवरंग: मन, शरीर आणि आत्मा” हा विशेष कार्यक्रम शहापूर येथील वैश्य समाज हॉल येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. या कार्यक्रमात शहापूर मधील अतिदुर्गम अशा २४ माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी तील सुमारे १२०० विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांनी सहभाग घेतला.
नावातच नवरंग असणाऱ्या या कार्यक्रमात विविध रंगी बहुआयामी अशा नऊ उपक्रमांचा समावेश होता. आयडील ई लर्निग ॲप, करिअर मार्गदर्शन, मानसिक आरोग्य आणि व्यसनमुक्तीबाबत चर्चा, गुड टच आणि बॅड टच याविषयी जागरूकता, सीपीआर प्रशिक्षण, र्थेलीसिमिया आणि सिकल सेल रक्त तपासणी, अन्नदान इत्यादी वरील वेगवेगळ्या विषयांवर एकाच ठिकाणी उपक्रम प्रत्यक्षात प्रथमच पार पडले. तसेच कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड व प्रमाणपत्र फोल्डर भेटवस्तू देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमात शहापूर तालुक्यातील आदिवासी भागात शिक्षण प्रसाराचे काम करण्यासाठी मौलाचा हातभार लावणाऱ्या ३ निवृत्त अधिकाऱ्यांचा शिक्षणरत्न आणि मुलांनी निवडेलेल्या १३ शिक्षकांचा राष्ट्रनिर्माते या पुरस्काराने गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे (बाल्या मामा) आणि मुख्य अतिथी म्हणून डीजीएन डॉ. निलेश जयवंत उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यात क्लबचे अध्यक्ष आरटीएन निलेश दहिफुले, क्लब सेक्रेटरी रचिता मुल्की, आणि प्रोजेक्ट चेअर आरटीएन धीरज म्हात्रे व संस्थेच्या मार्गदर्शक श्रीमती मनीषा कोंडूस्कर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे हिरानंदानी लिजंड्स रोटरी क्लबची संपूर्ण टिम आणि फॅंड्री फाउंडेशनच्या स्वयंसेवक विद्या पिकले, नितीन ढेपे,रोहित शिरोडकर आणि टिम यांचाही मोलाचा सहभाग होता.
या कार्यक्रमामुळे सहभागी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बुद्धी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला चालना मिळाली हे आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदावरुन दिसून आले. भविष्यात अशा असेच आणखी उपक्रमांचे आयोजन ठाणे हिरानंदानी लिजंड्स रोटरी क्लब आणि फँड्री फाउंडेशन मुंबई यांच्या नेतृत्वाखाली शहापूर सारख्या दुर्गम भागात पार पडतील, असे आश्वासन कार्यक्रमाच्या आयोजकांनी दिले.