ठाणे : नौपाडा विभागातील एम जी रोड महापालिका पेटीजवळील महापालिकेच्या इलेक्ट्रिक पॅनल जवळ केबलमुळे लागलेल्या छोट्याश्या आगीमुळे जवळ असलेल्या झाडाने पेट घ्यायला सुरुवात झाली.
रस्त्यावर ये जा करणाऱ्या नागरिकांनी ही गोष्ट अभिनय कट्ट्यावर येऊन सांगितली. तिथे उपस्थित किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या वुई आर फॉर यू च्या सर्व सहकाऱ्यांनी धाव घेतली.
प्रसंगावधान राखून जवळ असलेले बोरिंग सुरू करून पाण्याचा पाईप लावून पाणी मारायला सुरुवात केली.तसेच माती टाकून आज आग विझवली व मोठी दुर्घटना टळली. संभाजी आंद्रे ,अशोक कदम, रवींद्र खैर, हर्षल आठवले, मनोज पपुले,सुधीर जाधव या सर्व टीमने किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली हे धाडसी कार्य केले. नौपाडा परिसरातील नागरिकांनी आभार मानले.