ढाका : इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांना बांगलादेशातील चितगाव येथे अटक करण्यात आल्यानंतर हिंदू समाजात तीव्र संताप निर्माण झाला आहे. अटकेच्या विरोधात हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरत मशाल रॅली काढली.
This is Bangladesh
Hindus were identified by checking their IDs and being k*ll*d by radical Isl@mi&ts.
They don’t care whether you are Tamil,Telugu,Kannada or Gen,SC, ST, OBC
They are k*ll*ng if you are not a Muslim
ISKCON #SaveBangladeshiHindus #ReleaseChinmoyKrishnaDas pic.twitter.com/1iiFbXMvpP
— Dr Vivek Pandey (@Vivekpandey21) November 26, 2024
या दरम्यान, बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी हिंदूंच्या विरोधात हल्ले केले. ५० हून अधिक जण जखमी झाले असून शाहबागमध्ये चितगाव विद्यापीठाचे प्राध्यापक कुशल बरन यांच्यावरही हल्ला करण्यात आला. प्रशासन मात्र या हिंसाचाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
पश्चिम बंगाल भाजप नेत्या सुकांता मजुमदार यांनी या घटनांचा तीव्र निषेध करत भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.
चिन्मय दास यांना ढाका विमानतळावरून अटक करण्यात आली असून, या घटनेने अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही यावर लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.