मुझफ्फराबाद, 20 नोव्हेंबर : पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) राष्ट्रपतींच्या अध्यादेशाला विरोध तीव्र झाला आहे. अध्यादेशाविरोधातील आंदोलनादरम्यान रावळकोट आणि मीरपूरमध्ये झालेल्या अटकेमुळे पीओकेमध्ये अशांततेचे ढग दाटून आले आहेत. संयुक्त जन कृती समितीने पुन्हा एकदा पीओकेमध्ये ५ डिसेंबरपासून बंदची हाक दिली आहे.
ARY न्यूज चॅनलच्या वृत्तानुसार, संयुक्त लोक कृती समितीने म्हटले आहे की, राष्ट्रपतींचा अध्यादेश रद्द करून चार्टर लागू करण्यात यावा. या अध्यादेशात प्रत्येक प्रकारच्या आंदोलनासाठी प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पीओकेच्या लोकांनी स्वस्त वीज आणि पिठाच्या मागणीसाठी मे महिन्यात नाकेबंदी केली होती. या काळात रावळकोट, मीरपूर आणि प्रदेशातील इतर भागात सर्व व्यवसाय केंद्रे, कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद राहिल्या.